गाजियाबाद | लालसिंग चड्ढाच्या चित्रीकरणासाठी अभिनेता आमिर खान गाजियाबाद मधील लोनी येथे आला. शूटिंग संपल्यावर विना मास्क, सोशल डिस्टसिंग न पाळता तो आपल्या चाहत्यासोबत सेल्फी होता. मात्र हे सेल्फी घेणं आमिरला चांगलंच महागात पडलं आहे.
लोनी विधानसभेचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी कोविडचा प्रोटोकॉल मोडल्याप्रकरणी आमिर खानवर गुन्हा दाखल केला आहे. गुर्जर यांनी आरोपच नाही तर त्यानंतर पोलीस तक्रारही केली आहे.
‘रील लाईफ’ हिरोने ‘रियल लाईफ’ मध्येसुद्धा ‘हिरो’ असायला हवं आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. ‘विलेन’सारखं आपलं जीवन धोक्यात घालू नये, असं नंद किशोर गुर्जर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईसारख्या कोरोना हॉटस्पॉट ठिकाणाहून येऊन नियम न पाळता चित्रीकरण करता आणि गर्दी जमवतात हे सहन केलं जाणार नसल्याचंही गुर्जर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“मी सगळा खुलासा केला तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड जाईल”
“मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय हा संग्राम थांबणार नाही”
मंदिरं खुली करण्यापासून शिवसेना दूर का जातेय?; प्रवीण दरेकर यांचा सवाल
चेन्नईच्या पिवळ्या जर्सीतील शेवटचा सामना? अखेर धोनीने दिलं उत्तर; म्हणाला…