बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजाबमधून दिसायला लागली 200 किलोमीटर अंतरावरची हिमालयाची शिखरं!

नवी दिल्ली | भारतामध्येही 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. याचा सकारात्मक परिणाम पर्यावरणावर झाल्याचं दिसून येत आहे. याचीच प्रचिती देणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ओदिसामध्ये कार्यरत असणारे सरकारी अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो ट्विट केला आहे. त्यांनी हा फोटो हिमाचलमधील धौदाधर पर्वतरांगांचा आहे असं म्हटलंय. हा फोटो पंजाबमधील जलंदरमधून काढण्यात आल्याचं सुशांत यांनी सांगितलं आहे.

निसर्ग काय आहे आणि आपण काय करुन ठेवलयं हे या फोटोतून दिसत आहे. हा फोटो आहे हिमालचमधील धौदाधर पर्वतरांगाचा. या पर्वतरांगा पंजाबमधील जलंदरमधून 30 वर्षानंतर दिसत आहेत. मागील 30 वर्षानंतर पहिल्यांदाच हवेतील प्रदुषणाचा स्तर इतका कमी झाला आहे. या दोन्ही जागांमधील अंतर अंदाजे 200 किलोमीटर आहे, असं ट्विट नंदा यांनी केलं आहे.

दरम्यान, फोटो मला माझ्या मित्राने पाठवला असून हा खरा आहे का याबद्दल मला ठोसपणे सांगता येणार नाही, असंही नंदा यांनी म्हटलं आहे. तसेच हा फोटो अंशुल चोप्रा यांनी काढल्याचं नंदा यांनी सांगितलंय.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“निवडणुकीला कुणाला मतदान करायचं?; हे सांगणारे मुल्ला-मौलवी कुठे आहेत?”

‘देशात सध्या लॉकडाऊन पण नंतर आम्ही आहोतच’; राज ठाकरे यांचा विकृतांना इशारा

महत्वाच्या बातम्या-

निवडणूक आयोगाचा आदेश जारी; महाविकास आघाडीचं सरकार संकटात!

लाईट बंद करण्यावरून आजी माजी उर्जामंत्र्यांमध्ये जुंपली

“निवडणुकीला कुणाला मतदान करायचं?; हे सांगणारे मुल्ला-मौलवी कुठे आहेत?”

टेलिग्रामवर सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच पुढील लिंकवर क्लिक करा- https://t.me/thodkyaatNews

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More