यवतमाळ | कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पुण्यातील ‘त्या’ प्रवाशांबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील 11 जणांनी प्रवास केल्याचं उघडकीस आल्यानं प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
सर्व 11 जणांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आज दुपारी त्यांची आरोग्य तपासणी होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील तीन कुटुंबातील अकरा जण 24 फेब्रुवारीला दुबईला गेले होते.
यवतमाळ जिल्ह्यातील हे प्रवासी दुबईहून परतल्यापासून गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी वावरले आहेत. त्यामुळं चिंतेत भर पडली आहे.
दरम्यान, आम्हाला कसलाही त्रास नाही. कालपर्यंत आमच्याशी कोणी संपर्क साधला नाही. कालपासून अचानक अनेकांचे फोन येत आहेत, असं संशयिताचं म्हणणं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोना गो नाही, तर मग काय कोरोना या, असं म्हणू का?- रामदास आठवले
भय इथले संपत नाही! कोरोनाच्या भीतीमुळे पुण्यातील ‘या’ शाळांना सुट्टी
महत्वाच्या बातम्या-
शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने राऊतांची तंतरली- अमेय खोपकर
#Corona I परदेशातून आलेल्या कुटुंबाला स्वत:च्या घरातच नो एन्ट्री; प्रकरण पोलिसात
Comments are closed.