देश

‘मी तुम्हाला शेवटची ताकीद देतोय’; अरविंद केजरीवाल संतापले

नवी दिल्ली | दिल्लीत कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णांकडे रुग्णालयांकडून दुर्लक्ष केलं जात असून त्यांना दाखल केलं जात नसल्याचा आरोप होत आहे. या आरोपांवर अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीमध्ये कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी बेडची कोणतीही कमतरता नसून, लक्षणं असलेल्या एकाही रुग्णालाकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये अशी ताकीद अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

काही रुग्णालयं कोरोना रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार देत आहेत. इतर पक्षात असणाऱ्या आपल्या रक्षणकर्त्यांचा वापर करत बेडचा काळा बाजार करणाऱ्यांना मी ताकीद देत आहे की, त्यांना सोडलं जाणार नाही, अशा शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी खडसावलं आहे.

दरम्यान, सर्व काही सुरळीत झाल्यानंतर याकडे लक्ष देता येईल. आम्ही याप्रकरणी तपास करु आणि बेड उपलब्ध असतानाही दाखल करुन घेण्यास नकार देणाऱ्यांविरोधात कारवाी करु, असं केजरीवाल म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

‘या’ बड्या नेत्याने ट्विटरवरून भाजप हटवले, पक्षामध्ये एकच खळबळ

येत्या ४८ तासात महाराष्ट्रातील ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

महत्वाच्या बातम्या-

पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्या; राजेंद्र विखे पाटलांची राज्यपालांकडे मागणी

शिवछत्रपतींचा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध; मुख्यमंत्र्यांचं शिवाजीराजांना वंदन

मंत्री आदित्य ठाकरेंकडून पर्यावरण खात्यासंबंधी मोठा बदल!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या