बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी सरकारचा मोठा निर्णय; अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सुरु करण्याची परवानगी

नवी दिल्ली | लॉकडाउनमुळे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या कामगार, भाविक, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना आंततराज्य प्रवासासाठी मुभा दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अडकलेल्या या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सेवा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत ही ट्रेन सेवा सुरु करण्यात येणार आहे. ट्रेन सेवा सुरळीत व्हावी यासाठी राज्य सरकारांमध्ये समनव्य राहावा यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.

तिकिटांच्या विक्रीसंबंधी रेल्वे मंत्रालय सविस्तर माहिती देईल असं आदेशात सांगण्यात आलं आहे. तसंच ट्रेन आणि स्थानकांवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्यासंबंधी तसंच सुरक्षेच्या इतर उपाययोजनांबद्दलही रेल्वे मंत्रालयाकडून सूचना जारी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, केंद्राच्या नव्या निर्णयामुळे सुमारे 40 दिवस अडकून पडलेल्या मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

संजय राऊतांनी मानले निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारचे आभार!

उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला; महाराष्ट्र दिनाला महाविकास आघाडीला गोड बातमी!

महत्वाच्या बातम्या-

जास्त लोभ न ठेवता ना नफा ना तोटा तत्वावर घरे विकून मोकळे व्हा- नितीन गडकरी

‘आम्ही पुन्हा येऊ हा प्रयत्न फसला’; जयंत पाटलांचा विरोधकांना टोला

“इरफान खान आणि ऋषी कपूर गेले, आता पुढचा नंबर कोणाचा मला ठाऊक आहे”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More