बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

3 मे रोजी लॉकडाउन संपणार का?; उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

मुंबई | लॉकडाउन 3 मे रोजी संपत असून यानंतर लॉकडाउन वाढवला जाणार की शिथील करणार यासंबंधी चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउन वाढवला जाणार की शिथील करणार यावर भाष्य केलं आहे.

रेड झोनमध्ये मुंबई, पनवेल, कल्याण आणि आजुबाजूचा परिसर आला. पुणे, नागपूर जिथे आकडे वाढत आहेत तिथे काही कऱणं आपल्या हिताचं नाही. ऑरेंज झोनमध्ये काही परिसर सोडले तर उरलेल्या ठिकाणी काय सुरु करु शकतो याचा विचार करत आहोत. ग्रीन झोनमध्ये आपण थोडी शिथिलता आणत आहोत, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

बेरोजगारी वाढणार असं सांगितलं जात आहे. हे खऱं आहे, नाही असं म्हणणं योग्य नाही. पण संपत्ती जर म्हणाल तर प्रत्येक राष्ट्राची आणि राज्याची महत्त्वाची आणि खऱी संपत्ती त्याची जनता असते. त्यांना प्राथमिकता दिली पाहिजे. नागरिक वाचले पाहिजे. ते सैनिक आहे. ते वाचले तर हा गाडा चिखलातून काढून पुढे नेऊ शकतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

परराज्यात जे जाऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यांच्यासाठी आपण सोय करत आहोत. पण लगेच झुंबड करु नका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

संजय राऊतांनी मानले निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारचे आभार!

उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला; महाराष्ट्र दिनाला महाविकास आघाडीला गोड बातमी!

महत्वाच्या बातम्या-

संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षामध्ये लढा देणाऱ्या, रक्त सांडणाऱ्यांना मानाचा मुजरा- उद्धव ठाकरे

हो, मी पुरावे बघितलेत, वुहानच्या लॅबमधूनच कोरोनाची उत्पत्ती- डोनाल्ड ट्रम्प

“आता मुखपत्रातून नव्या जोमाने पंतप्रधानांचा शेलक्या भाषेत उल्लेख सुरु करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More