पुणे महाराष्ट्र

पेस्ट कंट्रोलनंतर खबरदारी न घेणं जिवावर बेतलं; पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू

पुणे | पेस्ट कंट्रोलनंतर योग्य ती खबरदारी न घेणं पुण्यातील एका दाम्पत्याला जीवावर बेतलं आहे. बिबवेवाडीतील गणेश विहार सोसायटीतील दाम्पत्याचा घरात गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अविनाश मजली (वय 64) आणि अपर्णा मजली (54) असं मृत्यू झालेल्या दाम्पत्याची नावं आहेत. मजली दाम्पत्याने मंगळवारी घरी पेस्ट कंट्रोल केले होते. त्यानंतर हे कुटुंब भावाकडे राह्यला गेले. परत घरी आल्यानंतर या कुटुबांने योग्य ती खबरदारी घेतली नाही.

पेस्ट कंट्रोल करणाऱ्या व्यक्तीने काळजी घेण्यास सांगितले होते. घरातील वायू बाहेर पडण्यासाठी दरवाजे, खिडक्या उघडे ठेवण्यास त्याने सांगितलं होतं. मात्र, दाम्पत्याने याकडे दुर्लक्ष करत खिडक्या, दरवाजे बंद करुन टीव्ही पाहत होते. यातच त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला.

या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पेस्ट कंट्रोल केल्यानंतर योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय मुर्खपणाचा’; काँग्रेस नेत्यानंच सरकारला सुनावलं

आळशी सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा कशाला?- राजू शेट्टी

महत्वाच्या बातम्या-

“उद्धवजी, राष्ट्रपुरूषांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबद्दल तुमची भूमिका स्पष्ट करा”

छत्रपतींचा वंशज म्हणून असलं क्रूर कृत्य कदापी सहन करणार नाही- संभाजी राजे

शाळांमधून सावरकरांचे फोटो काढण्याचे राज्य सरकारचे आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या