बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन् न्यायालयाने दिले थेट जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश

औरंगाबाद | राज्यात रस्ते, एमआयडीसी, विविध प्रकल्प, सिंचन यांसाठी शेतकऱ्यांची जमिन अधिग्रहण करण्यात येते. योग्य मोबदला आणि मावेजा मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडून अनेकदा राज्यात आंदोलन करण्यात आली आहेत. आताही एका अशाच प्रकरणात औरंगाबाद दिवाणी न्यायालयानं चक्क जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिल्यानं राज्यात खळबळ माजली आहे.

औरंगाबाद दिवाणी न्यायलयानं एका जमीन अधिग्रहणाच्या खटल्यात सुनावणी करताना थेट जिल्हाधिकाऱ्यांना घेऱ्यात घेतलं आहे. फुलंब्री तालुक्यातील एका शेतकऱ्याला आपल्या जमिनीचा मावेजा मिळाला नसल्यानं हे प्रकरण सध्या दिवाणी न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना नोटिस बजावली होती पण जिल्हाधिकाऱ्यांनी या नोटीशीला उत्तर न दिल्यानं न्यायावयानं थेट जिल्हाधिकारी कार्यालायातील खुर्ची आणि इतर साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी सध्या औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालायात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

न्यायालयाच्या नोटिशीला उत्तर न दिल्यावरून औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या कार्यालायवर गुरूवारी बेलिफ दाखल झाले आहेत. मावेजा लवकरात लवकर जमा करा अन्यथा कार्यालयातील 23 लाख किंमतीच्या मालमत्ता कोणत्याही क्षणी जप्त होण्याची वेळ चव्हाण यांच्यावर येऊ शकते. परिणामी मावेज रक्कम देण्यासाठी चव्हाण यांचं कार्यालय जोरदार धावपळ करताना दिसत आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाला नोटीस बजावण्यात आलेलं प्रकरण हे फुलंब्री तालूक्यातील बाभूळगाव येथील लघूजलसिंचन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचं आहे. ही जमिन 1980 मध्ये संपादित करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या 

ऐन दिवाळीत पाऊस झोडपणार! हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

कर्नाटकमध्ये हायअलर्ट जारी! पुनीत राजकुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

IPL 2022ची रंगत वाढली! जाणून घ्या कोणता संघ कोणत्या खेळाडूंना कायम ठेवणार

‘समीर वानखेडेंना बॉलिवूडवर हल्ला…’; दिग्दर्शक अनुराग कश्यपचा ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल

“30 हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं सुरू आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More