श्रीपाद छिंदम तडीपारच; जिल्हा न्यायालयाने अर्ज फेटाळला

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वारणाऱ्या श्रीपाद छिंदम याची तडीपारी जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे. श्रीपाद छिंदम याने तडीपारीच्या कारवाई विरोधात न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी श्रीपाद छिंदमवर तडीपारीचा आदेश काढला होता. या आदेशाविरुद्ध छिंदमने जिल्हा न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला होता.

श्रीपाद छिंदम याने अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. छिंदमने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारी वकीलांनी केला.

दरम्यान, श्रीपाद छिंदमच्या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्यासमोर सुनावणी करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-

-सरकारवर टीका करण्यासाठी मला तुमच्या व्यासपीठाची गरज नाही!

-विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या वडिलांचं निधन

-सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी काँग्रेसला शाेकसभा सुरु आहे असं वाटत होतं- नरेंद्र मोदी

-आम्ही राम मंदिराचा विषय अजून सोडून दिलेला नाही- उद्धव ठाकरे

-आता कितीही वेळा काढा एटीएममधून पैसे; स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर