बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमेरिकेचं पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळलं; भारतापेक्षा पाकला जास्त मदत

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी देत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधं मिळवलं. त्यासाठी भारताला या औषधावरील निर्यात बंदी उठवावी लागली.

जगावर कोरोना व्हायरसचं संकट ओढवल्यानंतर अमेरिकेने जगातील अनेक देशांना आरोग्य सहाय्यता निधी जाहीर केला आहे. अमेरिकेच्या परदेश मंत्रालय आणि यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने आपातकालीन स्वास्थ, आर्थिक सहायता करता 508 मिलियन डॉलर खर्च करणार आहे.

भारताला आरोग्य सहाय्यता निधी म्हणून अमेरिकेने 5.9 मिलियन डॉलरची मदत केली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला 9.4 मिलियन डॉलर ची मदत केली आहे. यावरून अमेरिकेचं पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळल्याचं दिसून आलं आहे.

अमेरिकेने भारतासह अफगाणिस्तानला 18 मिलियन डॉलर, बांग्लादेश 9.6 मिलियन डॉलर, भूतानला 5 लाख डॉलर, नेपाळला 1.8 मिलियन डॉलर, आणि श्रीलंका 1.3 मिलियन डॉलरची मदत जाहीर केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

नाबार्डला 25 हजार कोटी, एनएचबीला 10 हजार कोटी , सीडबीला 15 हजार कोटी तर मायक्रो बँकिंगसाठी 50 हजार कोटींची RBI कडून मदत

चीनचा भारताला मदतीचा हात; पाठवले साडे 6 लाख रॅपिड किट

महत्वाच्या बातम्या-

बाबासाहेबांच्या जयंतीसाठी जमा केलेला निधी आपण दुर्बल घटकांसाठी वापरूयात- प्रकाश आंबेडकर

“वाटलं होतं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर सर्वांना समान न्याय भेटेल पण…”

देश लॉकडाऊन, कर्नाटकात मात्र थाटामाटात पार पडला माजी पंतप्रधानांच्या नातवाचा विवाहसोहळा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More