राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येतबाबत राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
मुंबई। गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोरोना महामारीने जगभर धुमाकूळ घातला आहे. कोरोनापासून थोडा दिलासा मिळाला असं वाटत असतानाच महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री (Public Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.
मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबाराला उपस्थिती लावल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणं आढळून येत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. तर राजेश टोपेंनी दिलेल्या माहितीनुसार अजून तरी राज्यात कोणत्याही प्रकारचा नवीन व्हायरस आढळून आलेला नाही.
माध्यमांशी बोलत असताना पुढे ते असे देखील म्हणाले की, जरी काही राज्यात कोरोना संख्या वाढ जरी असली तरी ती काही भागात वाढत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड हे कोरोना रुग्ण वाढणारे क्षेत्र आहेत.
दरम्यान, कोरोनाचे वाढते रुग्ण संख्या पाहून पुन्हा एकदा सर्वाना सतर्केचा इशारा दिला आहे. शाळा सुरु झाल्याने मुलांना आणि शिक्षांकना मास्क वापरण्यास सांगितले असून सार्वजनिक ठिकाणी जात असाल तर मास्क गरजेचं आहे, असं आवाहन देखील राजेश टोपे यांनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
रामाकडे जावा नाहीतर काशीला, राज्यातील जनतेच्या मनातून तुम्ही संपलेले आहात”
सोनं-चांदीच्या दरात आज काय बदल झाले?, वाचा आजचे दर
पुढील पाच दिवस ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा
“ड्रोनाल्ड ट्रम्प तर आमच्या गावाकडचे तात्या, एकदम चांगला माणूस”
विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर अनिल परबांच्या अडचणीत वाढ!
Comments are closed.