बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांसाठी ‘सीरम’ने जाहीर केल्या कोविशिल्ड लसीच्या किंमती

पुणे | देशभरात सध्या कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कडक निर्बंध तर काही ठिकाणी कडक लॉकडाऊनची घोषणा देखील करण्यात आली आहे. देशभरात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केले की, आता 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोना लस घेता येणार आहे.

1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच कोरोना लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन करत असलेल्या लसीपैकी 50 टक्के लसींचा साठा हा खुल्या बाजारात विक्री करण्यास ही मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या कोव्हीशील्ड या लसीचे दर जाहीर केले आहेत.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने जाहीर केल्याप्रमाणे 50 टक्के लसीचा हिस्सा केंद्र सरकारच्या लसीकरणासाठी राखीव ठेवण्यात येणार असून उर्वरित 50 टक्के हिस्सा हा राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे. राज्य सरकारला ही लस 400 रुपये प्रति डोस प्रमाणे देण्यात येणार असून खाजगी रुग्णालयांना हाच दर 600 रुपये प्रति डोस प्रमाणे देण्यात येणार असल्याचं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.

येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये लसींचं उत्पादन वाढविण्यात येणार असून लसींची कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं अदर पूनावाला यांनी सांगितले तसेच पुढील पाच महिन्यांनंतर कोविशील्ड ही लस रिटेल आणि फ्री ट्रेड मध्ये बाजारात उपलब्ध असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. सिरमच्या लसीची किंमत ही इतर देशांच्या लसीच्या किमतीच्या तुलनेत कमी असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. याबाबत एक पत्रक जारी करून त्यांनी खुलासा केला आहे.

थोडक्यात बातम्या –

महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण!

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात ‘ही’ काळजी घ्या; एम्सच्या संचालकांचा मोलाचा सल्ला

“अजित पवारांनी झोप कमी करून पुण्याकडं लक्ष द्यावं, अन् झेपत नसेल तर…”

गजा मारणे प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; माजी खासदार संजय काकडेंना अटक

“सरकारी तिजोरीतून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अमोल कोल्हे यांनी ज्ञानामृत पाजावं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More