नवी दिल्ली| आत्महत्या करणारे शेतकरी भेकड असतात. जो आपली पत्नी आणि मुलांची काळजी घेऊ शकत नाही, तो भेकडच आत्महत्या करतो, अस संतापजनक वक्तव्य कर्नाटकातील भाजप सरकारमधील कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनी केलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे बी. सी. पाटील हे कोडागू जिल्ह्यात शेतकरी मेळाव्यात बोलतं असताना त्यांनी हे संतापजनक वक्तव्य केलं. त्यावेळी ते म्हणाले की, “या भेकड लोकांना जाणीव नाही की, शेती व्सवसाय किती लाभदायक आहे. पण तरीही ते जीव देतात”.
पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. तसेच एकीकडे केंद्र सरकार शेतकरी नेत्यांशी चर्चा करीत आहे. तर दुसरीकडे मात्र सातत्याने भाजप नेते बेताल बडबड करीत आहेत.
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी या आंदोलनात शेतकरीच कमी आहेत, असं वक्तव्य केलं होते. हरियाणाच्या कृषीमंत्र्यांनी येथे आंदोलन करण्यापेक्षा दुसरीकडे जाऊन मरा, असं ते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
‘कांदळवन जमिनीवरील हरकती-दाव्यांची चौकशी तातडीने पूर्ण करा’; आदित्य ठाकरेंचे आदेश
अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा- अर्णब गोस्वामी
‘आमचे लोक तुम्हाला त्रास तर देत नाहीत ना?’; सोनिया गांधींच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले…
“…तर चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा”
‘…त्यामुळे जास्त उडू नकोस, मी कंगणा राणावत आहे’; शेतकरी आंदोलनावरुन कंगणा-दिलजीतमध्ये जुंपली