खेळ

पराभवानंतर जडेजाला झाले अश्रू अनावर; बोलत राहिला ‘हे’ वाक्य…!

नवी दिल्ली | विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा पराभव झाला. या पराभवामुळे रविंद्र जडेजा पूर्णपणे खचून गेला होता, अशी माहिती त्याची पत्नी रिवाबा सोलंकीने दिली आहे.

पराभवानंतर त्याचं रडणं थांबतच नव्हतं रडता रडता सतत ‘मी बाद झालो नसतो तर आम्ही जिंकलो असतो’ हे एकच वाक्य तो बोलत राहीला, असं रिवाबाने सांगितलं आहे.

जडेजा आणि धोनी यांनी सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागिदारी केली. रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या या खेळीमुळे भारताला लाजिरवाणा पराभव टाळता आला. मात्र जडेजा आणि धोनी बाद झाल्यानंतर भारताचं आव्हान संपुष्टात आलं.

दरम्यान, पराभवानंतर ट्वीट करुन जडेजाने भारतीय चाहत्यांचे आभार मानले.

महत्वाच्या बातम्या-

-2014ची UPSC टॉपर पण तिला केलं ‘या’ नावाने ट्रोल! विकृत मानसिकता समाजात कायम

-पुण्यात चॉकलेट सुन्याच्या गँगचा धुमाकूळ

“उद्योगपती देशाला चुना लावून देश सोडतात तर आमचा शेतकरी कर्जामुळे देह सोडतो”

26/11 चा मास्टरमाईंड हाफिज सईदला बेड्या

-वादग्रस्त धार्मिक पोस्ट करणं तरूणीला पडलं महागात; कोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या