खेळ

ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव! भारताच्या ‘या’ खेळाडूंवर वर्णद्वेषाची टीका, तक्रार दाखल

सिडनी | भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा कसोटी सामना चालू आहे. कसोटीतील तिसऱ्या दिवशी भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि गोलंदाज मोहम्मद सिराज यांना वर्णद्वेषी टीका केल्याची माहिती समोर आली आहे.

जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांना प्रेक्षकांनी वांशिक वर्णद्वेषी शिवीगाळ केली आहे.  संघ व्यवस्थापनाची याबाबत तक्रार दाखल केली आहे. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टेडियमच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि टीम मॅनेजमेंटच्या सदस्यांशी चर्चा केली.

बुमराह आणि सिराजवर गेल्या दोन दिवसांपासून प्रेक्षकांकडून वांशिक भाष्य केले जात आहे. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यासह वरिष्ठ भारतीय खेळाडूंनी सामनाधिकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

सिराज फाईन लेग ला फिल्डिंग करत होता, काही दर्शकांनी त्यांच्यावर वांशिक भाष्य केले. बुमराहनेही याबद्दल तक्रार केली आहे. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पंच व सामनाधिकारी डेव्हिड बून हे देखील भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन या विषयावर चर्चा करताना दिसले.

थोडक्यात बातम्या-

‘मुख्यमंत्र्यांनी शहरांची नाव बदलण्यावर जोर देण्याऐवजी सरकारी दवाखान्यांकडे …’; काँग्रेस नेत्याचा ठाकरेंवर निशाणा

“बाळासाहेबांच्या जयंती दिवशी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं

या आईचा हंबरडा तुमच्या काळजाचं पाणी पाणी करेल का???

भंडाऱ्यातील मन सुन्न करणाऱ्या घटनेवर मोदीही हळहळले; म्हणाले…

भंडाऱ्यातील पीडित कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या