आदित्य ठाकरेंवरील टीकेमुळे किशोरी पेडणेकर संतापल्या, म्हणाल्या…
मुंबई | एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) बंड केलं. त्यांची मुख्यमंत्रिपदावर वर्णी सुद्धा लागली. त्यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांची मनधरणी करायचा प्रयत्न सेनेन केला. मात्र त्यांचा काही उपयोग झाला नाही. याचवेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीचं दर्शन घेतलं. उद्धवजी तुमच्यासाठी चांगला निर्णय घेतील. परत या, अशी भावनिक साद किशोरी पेडणेकरांनी एकनाथ शिंदे यांना घातली होती.
यानंतर किशोरी पेडणेकर आता आक्रमक झाल्या आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर यांनी आदित्य ठाकरेबद्दल वक्तव्य केलं होतं. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भाषा बोलू लागले आहेत, असं ते म्हणाले. यावर पेेडणेकर म्हणाल्या केसरकर हे उडता पंछी आहेत, ईकडून तिकडे बस असं करत असतात. त्यांच्याबद्दल आमच्या सारख्या शिवसैनिकांना प्रश्न विचारू नये, असं त्या म्हणाल्या
शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Deepali Syed) यांनी शिंदेची भेट घेतली. याबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या सध्याच्या घडीला सगळेच आशावादी आहोत. दिपाली सय्यद यांच्या मध्यस्थीने गोष्टी चांगल्या होणार असतील तर चांगलंच आहे. आला तर तुमच्या सोबत नाहीतर तुमच्याशिवाय असा टोलाही त्यांनी लगावलाय.
मी कोणाचं नाव घेत नाही पण अशा त्सुनामी शिवसेनेनं पाहिल्या आहेत. यादर 15 वर्षांनी होत असतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेली पडझड भरून काढण्याची ताकद आमच्यात आहे. येणाऱ्या मुंबई (Mumbai) महापालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांचा झेंडा फडकेल. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात झेंडा फडकवरणाच, असंही त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
थोडत्यात बातम्या
‘द्रौपदी मुर्मूंकडून दुष्ट प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व’, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
मोठी बातमी! श्रीलंकेत आणीबाणी जाहीर
लस घेतल्याने ‘या’ कॅन्सरचा धोका कमी होणार, अदर पूनावाला यांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती
लिंबू पाणी जितकं प्रभावी तितकंच घातकही, उद्भवू शकतात ‘हे’ सहा आजार
‘राजनाथ सिंह यांचा फोन आला आणि मला म्हणाले अस्सलाम वालेकुम’ -उद्धव ठाकरे
Comments are closed.