बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे दर

नवी दिल्ली | कच्च्या तेलाच्या (crude oil) सातत्याने चढ-उतार झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेत कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे. मात्र तेलाच्या पुरवठा कमी असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढले आहेत. मात्र कच्च्या तेलाचे दर अजूनही निचांकी स्तरावर आहे.

कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली असली तरी भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. भारतीय इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. ((Petrol Diesel Price Today)

मुंबईत (Mumbai) प्रतिलीटर पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये झाला आहे. नागपूर मध्ये पेट्रोल 106.04 प्रति लीटर आहे. 92.36 प्रति लीटर इतकं डिझेल आहे. पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 105.84 प्रति लिटर आणि 92.36 इतका आहे.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये (Kolhapur) पेट्रोल 106.47 तर डिझेल 93.01 प्रति लीटर इतका आहे. संभाजीनगर आणि परभणीत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. संभाजीनगरमध्ये पेट्रोल 108 प्रति लीटर आणि डिझेल 95.96 रूपयांनी विकलं जात आहे. तर परभणीत पेट्रोल 109.41 तर डिझेल 95.81 इतका आहे.

थोडक्यात बातम्या

‘हे अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन’, वेदांता प्रकल्पावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

“अजितदादांना मुख्यमंत्री करा, तुम्हाला केंद्रात मोठं पद देऊ”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More