बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेल्वेचा गोंधळ… मुंबईत रात्री उशिरा CSMT आणि टिळक टर्मिनसवर झोप उडवणारी गर्दी

मुंबई |  रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे मुंबईत रात्री उशिरा स्थलांतरित मजुरांची मुंबईतील दोन स्थानकांवर झुंबड उडालेली  पाहायला मिळाली. सीएसएमटी स्टेशनवर 10 हजार तर लोकमान्य टिळक टर्मिनसला 15 हजार प्रवाशांची गर्दी केली होती.

दोन्ही स्थानकांवर एवढा मोठा जमाव जमल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. एकतर जमलेले मजूर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काहीही करून आम्हाला आता मुंबईत रहायचं नाही, आम्हाला आमच्या गावाकडे जायचं आहे, असं त्या मजुरांचं म्हणणं होतं.

सीएसएमटी स्टेशनची क्षमता 23 रेल्वे गाड्यांची असताना रेल्वेने 46 गाड्यांचं वेळापत्रक एका दिवशी लावलं आहे. इंजिन नाही म्हणून प्रवासी भरलेल्या काही गाड्या 3-3 तासापासून स्टेशनवर उभ्या आहेत.

रेल्वेने आखून दिलेल्या लिस्टप्रमाणे कामगार स्टेशनवर आले. मात्र रेल्वेकडून रॅक उपलब्ध नसल्याचं कारण सांगितलं जातंय. राज्य सरकार तिकीटाचे पैसे देत असल्याने एका गाडीचं एकच तिकीट द्यावं अशी राज्य सरकारची मागणी आहे. मात्र रेल्वेनं प्रत्येक प्रवाशांला वेगळं तिकीट घ्यावं लागेल सांगून रांगेत उभ केलं.

ट्रेंडिंग बातम्या-

पियूष गोयल यांचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले….

“ठाकरे सरकारला फडणवीसांच्या सल्ल्याची गरज नाही, त्यासाठी त्यांनी एखादी कंपनी उघडावी”

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात एकाच दिवशी 399 बाधित; महापौरांच्या खुलाश्याने पुणेकरांनी सोडला सुटकेचा निश्वास

“माझं काही खरं नाही,…तर मी लगेच दुसऱ्या पक्षात उडी मारतो”

“अर्थशास्त्र आम्हालाही समजतं, फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीची उद्या चिरफाड करू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More