बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सीटी स्कॅनमुळे कॅन्सर होण्याचाही धोका संभवतो मग सीटीस्कॅन करावं की नाही?, तात्याराव लहाने म्हणाले….

मुंबई | कोरोनाचा प्रादुुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपली जीव गमवला. लोकांमध्ये कोरोनाची खूप दहशत पसरली आहे. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात सीटी स्कॅन करू लागले आहेत. मात्र सीटी स्कॅनमुळे कॅन्सर होण्याचाही धोका संभवतो, असं एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरीया यांनी सांगितलं. त्यामुळे नागरिक संभ्रमात आहेत की सीटी स्कॅन करावं की नाही?, याबाबत राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी माहिती दिली आहे.

तुमच्यामध्ये कोरोनाची चिन्ह-लक्षण असतील, तुम्हाला दोन-तीन दिवस ताप येत असेल तर सीटी स्कॅन करा. चिन्ह-लक्षण नसताना सीटी-स्कॅन करण्याची गरज नाही. सीटी स्कॅन केल्यानंतर लगेच कॅन्सर होईल म्हणून घाबरुन जाऊ नका, असं तात्याराव लहाने म्हणाले.

शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण 95 पेक्षा कमी असेल, कोरोनाची लक्षणे असतील.  फुफुसांमध्ये कितपत संसर्ग झालाय, ते तपासण्यासाठी सीटी स्कॅन करणं योग्य आहे. पण कोरोनाच्या 80 टक्के रुग्णांमध्ये लक्षणेच नसतात त्यांनी सीटी स्कॅन करण्याची आवश्यकता नाही. काही जण सीटी स्कॅनवरुन उपचार सुरु करतात पण तसं करु नका, असा सल्ला तात्याराव लहानेंनी दिला आहे.

दरम्यान, सीटी स्कॅन करताना रेडिएशन असते. या बद्दल सर्वांना माहित आहे. जास्तवेळ सीटी स्कॅन केल्यास हे रेडिएशन शरीराला अपायकारक ठरु शकते. आता पेशंट आला की, लगेच आपण सीटी स्कॅन करतो. सीटी स्कॅनच्या टास्क फोर्सने काही गाईडलाईन दिल्या असल्याचंही लहानेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

“बंगालची वाघीण जिंकली म्हणणारे आता मूग गिळून गप्प का आहेत?”

“महाराष्ट्राला दररोज 8 लाख लसींची गरज पण मिळतात फक्त…”

येत्या काही तासात या ‘6’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; शेतकऱ्यांसाठी खबरदारीच्या सूचना

“शुल्क भरलं नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही”

#कोराना! कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील ‘या’ तीन जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More