बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ग्राहकांची प्रतिक्षा संपली! टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त SUV आली बाजारात

नवी दिल्ली | भारतीय बाजारात सध्या चारचाकी गाड्यांची विक्री जोरात होत आहे. भारतीय बाजार हा जगातील सर्वात जास्त वेगानं विकसित होणारा बाजार आहे. परिणामी सर्व कंपन्यांची नजर भारतीय बाजारावर असते. टाटा समूह हा आपल्या देशातील एक मानद आणि चर्चित समूह आहे. टाटा मोटर्सनं आता भारतीय बाजारात सर्वात स्वस्त एसयूव्ही लाॅंच केली आहे.

मायक्रो एसयूव्ही टाटा पंच हे या नव्या माॅडलचं नाव आहे. भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त एसयूव्ही होण्याचा मान सुद्धा याच गाडीला जातो. भारतीय बाजारात टाटा एसयूव्हीच्या बेसिक व्हेरियंटसाठी एक्स शोरूम 5.49 लाख एवढी किंमत कंपनीनं ठेवली आहे. परिणामी ही गाडी भारतीय वाहन क्षेत्रातील स्वस्त गाडी आहे. ग्लोबल एनसीपी क्रॅश टेस्टनुसार ही गाडी देशातील सर्वात सुरक्षित गाडी आहे.

टाटा एसयूव्हीच्या टाॅप व्हेरियंटसाठी ग्राहकांना 8.49 लाख रूपये मोजावे लागणार आहेत. सदर किंमती या प्रस्तावित आहेत याचाच अर्थ कंपनी या किंमतीत वाढ देखील करू शकते. ही गाडी 18.97 किमी प्रतिलिटर एवढी सरासरी राखेल, असा कंपनीचा दावा आहे. ही गाडी आणखी काही माॅडेलच्या स्वरूपात बाजारात येत आहे. परिणामी माॅडेल प्रमाणं या गाडीच्या किंमतीत बदल होणार आहेत. ही गाडी विविध 7 रंगांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

दरम्यान, टाटा पंच ही गाडी कंपनीच्या फ्लेक्सीबल प्लॅटफाॅर्मवर आधारित आहे. परिणामी या गाडीत आणि अल्ट्रोजमध्ये काही साम्य आहेत. टाटा पंच ग्राहकांच्या पसंतीला उतरेल, अशी आशा टाटा मोटर्सनं व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या 

प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी राज ठाकरे अयोध्येला जाणार, कांचन गिरीजींनी घेतली भेट

आमच्या धर्माचा अपमान होत आहे म्हणत तरूणीला जबरदस्तीने काढायला लावला बुरखा… पाहा व्हिडीओ

“चोरांना आणि त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल”

…अन् क्षणात भलं मोठं घर कोसळलं, पाहा केरळमधील थरारक व्हिडीओ

भाजपला मोठा धक्का; ‘या’ दोन मोठ्या नेत्यांचा पक्षाला रामराम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More