बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ह.भ.प. इंदोरीकर महाराजांना दिलासा; सायबर सेलनं केला ‘हा’ मोठा खुलासा

मुंबई | ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना आणखी एक मोठा. दिलासा मिळाला आहे. निवृत्ती महाराजांवर असलेल्या आरोपाचा कुठलाही व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध नसल्याचं सायबर सेलनं म्हटलं आहे.

सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला संग केल्यास मुलगी होते, असं इंदुरीकर महाराजांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता, तसेच इंदुरीकर महाराजांवर कारवाई करण्याची मागणी होत होती.

इंदुरीकर महाराज यांनी या प्रकरणाचं खापर यूट्यूब चॅनेलवाल्यांवर फोडलं होतं. त्यानंतर त्यांनी या यूट्यूब चॅनलवाल्यांविरोधात कायदेशीर कारवाई देखील सुरु केली होती. त्यामुळे घाबरुन जाऊन अनेकांनी इंदोरीकर महाराजांचे यूट्यूबवर टाकलेले व्हिडीओ डिलीट केले.

दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सकांनीही यासंदर्भात पुरावे नसल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वीच केला होता. त्यांनीच सायबर सेलला यासंदर्भात काही व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत का?, यासंदर्भात विचारणा केली होती. आता यासंदर्भात व्हिडीओच उपलब्ध नसल्यानं इंदोरीकरांवर कारवाई होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधकांचा गोंधळ, सभागृहाचं कामकाज तहकूब

तावरे गुरु-शिष्याला अजित पवारांचा शह, माळेगावची सत्ता खेचून आणली

महत्वाच्या बातम्या-

“आता सुप्रिया ताईंना ‘सेल्फी विथ खड्डे’चा विसर पडला आहे का?”

अजित पवारांनी आपला ‘तो’ शब्द खरा करुन दाखवला!

धनंजय मुंडेंचं स्तुत्य पाऊल; रेल्वे ट्रॅकजवळ सापडलेल्या मुलीचं पालकत्व स्वीकारलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More