बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईच्या वेशीवर पोहोचले चक्रीवादळ; वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

मुंबई | गेल्या 3 दिवसांपासून अरबी सुमद्रात घोंगावणारे तौक्ते चक्रीवादळ आता मुंबईपासून काही किमी अंतरावरून जाणार आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरात याचे परिणाम दिसायला लागला आहे. मुंबईवरचा वादळाचा धोका जरी टळलेला असला तरी वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, ताैक्ते वादळ मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ पोहोचले असता प्रभाव कमी झाला आहे. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईपासून 170 किमी अंतरावरून हे चक्रीवादळ जाणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानं वर्तविलेला अंदाज लक्षात घेता दोन्ही दिवशी नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचं टाळावं. मुंबईतील चौपाट्या तसेच समुद्रकिनाऱ्या जवळील परिसरात नागरिकांनी जाऊ नये, असं आवाहन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सखल भागात पाणी साचू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व ठिकाणी उदंचन संच बसविण्यात आले आहे.

मुंबईसह, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये मध्यरात्रीपासून पावसानं हजेरी लावली आहे. पहाटे 3 वाजेपासून अनेक भागात पाऊस सुरू झाला आहे. चक्रीवादळ जेव्हा मुंबई जवळील समुद्र किनाऱ्यापासून जाईल तेव्हा मुंबईत हवेचा वेग जास्त असणार आहे. त्यामुळे 60 ते 70 किलोमीटर प्रति तासाने वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईकरांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे.

दरम्यान,  हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, तौक्ते चक्रीवादळामुळे 17 मे 2021 रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच सोसाट्याचा वाराही वाहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं रायगड जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट जारी केला आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या

झाडं लावून झाडांच्या मुळांशी अस्थीविसर्जन, वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी मुलीचा स्तुत्य निर्णय

‘तुम्ही भारताची जी निंदा करताय त्यानं मला रडू येतंय’; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचं भारत प्रेम

DRDO चं ‘हे’ ॲंन्टी कोव्हिड औषध आजपासून बाजारात उपलब्ध शास्त्रज्ञ म्हणाले…

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाला…

‘या’ कंपनीकडून ग्राहकांना मिळणार फ्री रिचार्ज; कोरोनाकाळात ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More