पुणे | टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरव केला. यावेळी बोलताना पूनावालांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
राजकारणी थापा मारत आहेत. आम्ही महिन्याला 10 कोटी लसींचं उत्पादन करतो. महिन्याला एवढं मोठं उत्पादन करणं सोपं नाही. जगात कोणतीही एक कंपनी 10 ते 12 कोटी लसींचं उत्पादन देऊ शकत नाही. पण आम्ही अॅडव्हान्समध्ये प्रयत्न करून आणि हजारो कोटींची गुंतवणूक करून हे केलं आहे, असं पूनावाला म्हणाले.
मोदी सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालून अतिशय वाईट गोष्ट केली आहे. माझा मुलगा मला म्हणाला की यावर बोलू नको, पण मी बोलणार आहे. कारण सिरम इन्स्टिट्यूट अनेक वर्षांपासून जगातील 170 देशांना लस पुरवते. पण आता त्यांना गरज असताना त्यांना लस देता येत नाही. या देशांनी लसीसाठी आधीच पैसै दिलेत. बील गेट्स फाउंडेशनने पाच हजार कोटी रुपये दिलेत. लसींची निर्यात सुरू केली पाहिजे. अनेक देशांनी आगाऊ पैसे दिले आहेत. त्यांना लसी पाठवायच्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.
लसीच्या किमतीत बदल झाल्याने सीरमचा नफा मोठ्या प्रमाणात बुडाला, पण भारतातील लोकांना लस मिळावी यासाठी आम्ही तो सहन केला. सीरमची लस ही जगातील सर्वांत स्वस्त आहे, असं पूनावालांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘तुम्ही विचार स्वातंत्र्यावर निर्बंध कसं घालू शकता?’; उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं
…नाहीतर पीएफ खात्यातून ऑनलाईन पैसे काढता येणार नाहीत, जाणून घ्या अधिक माहिती
संजय राठोडांच्या अडचणीत वाढ?; ‘त्या’ प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार
दिया मिर्झानं पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा फोटो!
न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयानंतर राज्यपालांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट
Comments are closed.