महाराष्ट्र मुंबई

“नारायण राणेंची वैद्यकीय तपासणी करायला हवी”

मुंबई | नारायण राणेंनी पत्रकार परिषद मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला आता शिवसेना नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणे यांची मेडिकल तपासणी करण्याची गरज असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलंय.

नारायण राणे यांचं वय आणि आदित्य ठाकरेंचं वय यामध्ये भरपूर अंतर आहे तरीही नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंकडून संयम कसा बाळगावा हे शिकलं पाहिजे, असं भुसे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांचा इतिहास आणि भूगोल सगळ्यांनाच माहित आहे. भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पत्रकार परिषदेतले हावभाव आणि बोलणं बघता त्यांची वैद्यकीय तपासणी करणं आवश्यक आहे, असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्याचा एकेरी उल्लेख नारायण राणेंनी करणं गैर आहे. एवढंच नाही तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं आहे, असं शिवसेना नेत्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

काहीजण पराभवाच्या वर्षपूर्तीसाठी बीडमध्ये येऊन गेले- धनंजय मुंडे

“थाळ्या नाही वाजवायच्या तर घरात बसून अंडी उबवायची?”

‘कुणीही कितीही टरटर केली तरी…’; नवाब मलिकांचा भाजपला टोला

“ना जीडीपी कळतो, ना अर्थव्यवस्था, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसलाय”

कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त! आरोग्यमंत्र्यांनी निश्चित केले नवे दर, जाणून घ्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या