बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कंगना एक महान व्यक्ती आहे, त्यांचा आदर करणं आपलं कर्तव्यच पण…”

मुंबई | प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. तसेच तिच्या वक्तव्यामुळे मोठं वादंग पेटल्याचं आणि तिच्यावर टीकेची झोड उठल्याचं पाहायला मिळत आहे. कंगनाने देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भिकेने मिळालं असल्याचं विधान केलं होतं. त्यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रीया उमटत आहेत.

राज्याचे कृषी मंत्री दादा भूसे यांनी कंगनाच्या वक्तव्यावरून आता आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. तसेच कंगनाला तिच्या वक्तव्यावरून खोचक टोलाही लगावला आहे. ‘माननीय कंगनाताई या महान व्यक्तीमत्त्व आहेत, अनेक स्वातंत्र्यवीर आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्याचं भान कोणी ठेवणार नसेल, तर याला काय म्हणावं’, अशी प्रतिक्रीया दादा भुसे यांनी दिली आहे.

कंगना रनौतच्या वादग्रस्त वक्तव्यावरून तिच्यावर टीकेची झोड उठली असताना कृषी मंत्री दादा भूसे यांनीही आपलं मत या प्रकरणात व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, ‘कंगना रनौत या महिला आहेत, आपल्या संस्कृतीनुसार त्यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्यच आहे. पण त्यांच्या वक्तव्याला किती महत्त्व द्यायचं हे ही तितकंच महत्त्वाचं आहे’

कंगनाच्या त्या वक्तव्यानंतरही ती शांत न बसता सोशल मीडियावरून वादग्रस्त पोस्ट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह आता राजकीय नेतेही आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना दिसत आहेत. सध्या कंगना ही चांगलीच चर्चेत असून तिने केलेल्या वक्तव्यावरून टीका होत असताना ती काय प्रतिक्रीया देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

थोडक्यात बातम्या

शरद पवारांकडून अनिल देशमुखांची पाठराखन, विरोधकांवर निशाणा साधत म्हणाले…

‘तिची लायकी नाही की…’, विजय वडेट्टीवारांनी भडकून केलं स्फोटक विधान

“मंत्री झगमगाटात पण विद्येचं माहेरघर अंधारात”

अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात गुन्हा दाखल; पत्नीने केले ‘हे’ गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर परिणाम काय?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More