महाराष्ट्र मुंबई

अन्नधान्याचा काळाबाजार होत असेल तर थेट मला फोन करा- दादा भुसे

Loading...

मुंबई | भाजीपाला घरपोच देण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजीपाला आणि अन्नधान्याचा काळाबाजार केला तर कठोर कारवाई करु, त्यासाठी पोलिसांकडे तक्रार करा, अन्यथा थेट मला फोन करा, असं कृषिमंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय.

शेतकऱ्यांचा कृषिमाल थेट कॉलनीमध्ये उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे.

Loading...

काळाबाजार होत असेल किंवा वाढीव दरानं विक्री केली जात असेल तर कठोर कारवाई करून जेलमध्ये पाठवलं जाईल. याबाबात तक्रार करण्यासाठी जिल्हा अधिकारी आणि पोलिसांनी कक्ष स्थापिन केला आहे. त्यामुळे तिथे तक्रार करावी किंवा मला संपर्क करू शकता, असं दादा भुसे यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांचं वाहन कुठेही अडवलं जाणार नाही. देशपातळीवर नाशिकचा शेतमाल मुंबई असो की दिल्ली असो, सर्व ठिकाणी जाण्यासाठी आरटीओच्या माध्यमातून स्टिकर वितरित केले जाणार आहेत, त्यामुळे शेतमालाची वाहतूक सुरळीत सुरु राहील, असं कृषिमंत्री म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाच्या संकटात पंतप्रधान मोदींच्या 7 मोठ्या घोषणा

आज महाराज असते तर त्यांनी माझा लढवय्या स्त्री म्हणून सन्मान केला असता- तृप्ती देसाई

महत्वाच्या बातम्या-

शिवसेना, राष्ट्रवादी आपल्या आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीला देणार

ज्ञानदा काय तुमच्या घरात कामाला आहे काय रे… ट्रोलर्सचा चाकणकरांनी घेतला यथेच्छ समाचार

मशिदीत नमाजाला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना नवाब मलिकांची कळकळीची विनंती; म्हणतात…

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या