बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दादा कोंडकेंच्या घराची झाली दयनीय अवस्था; प्रथमेश परबनं फोटो शेअर करत वेधलं सगळ्यांच लक्ष

मुंबई | आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनात एक वेगळीच छाप पाडणारे अभिनेते-निर्माते म्हणजे दादा कोंडके. या दिग्गज अभिनेत्याच्या घराची सध्या काय अवस्था आहे याकडे अभिनेता प्रथमेश परब यानं सगळ्यांच लक्ष केंद्रित केलं आहे.

प्रथमेश परब यानं सोशल मिडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. दादा कोंडकेंच्या घराबाहेरील फोटो शेअर करत लिहिलं की, विस्तीर्ण निळ्या नभाखाली दिसत असलेलं, मोडकळीस आलेलं घरं दुसरं तिसरं कोणाचं नसून, आपल्या महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार दादा कोंडके यांचं आहे. हे दादांचं रहातं घरं! हा फोटो झूम करून पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की या घराची किती दयनीय अवस्था झाली आहे ते!

पुढे प्रथमेशनं म्हटलं की आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील?? ज्या व्यक्तीने, हाऊसफुलच्या बोर्ड्सने चित्रपटगृहाची शोभा वाढविली, आपल्या अभिनयाने, प्रेक्षकांच्या मनात हक्काचं घर निर्माण केलं, खरंच, आज त्याच व्यक्तीच्या घराचं संवर्धन करणं, इतकं अवघड आहे का????? प्रश्न अनेक आहेत!! काही सुन्न करणारे तर काही अनुत्तरित….!!

दरम्यान, दादा कोंडके यांचं मूळ नाव कृष्णा कोंडके आहे. दादांचा सोंगाड्या हा चित्रपट रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला आणि मराठी चित्रपट सृष्टीला एक नवीन विनोदी अभिनेता मिळाला. दादा कोंडके यांचे चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले ते भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटाद्वारे.

थोजक्यात बातम्या – 

“अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्या नंतर पाठीत खंजीर खुपसला”

आश्चर्य! कोरोना लसीमुळे 9 वर्षानंतर 70 वर्षीय आजीची डोळ्यांची दृष्टी आली परत

पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जागतिक पातळीवरील नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदींचं नाव

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

”या’ प्रकरणाचा मुळाशी जाऊन तपास करावा’; निवेदिता सराफ यांची मुख्यमंत्र्यांसह, राज ठाकरेंना विनंती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More