बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! खेळाडूने हवेत उडी घेत पकडला अफलातून कॅच, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | क्रिकेट मध्ये एकापेक्षा एक अफलातून कॅच घेतलेले पाहायला मिळतात. फक्त आंतरराष्ट्रीय एकदिवसीय किंवा टी-20 मध्ये नाही तर आयपीएल आणि ‘बिग बॅश’ सारख्या टी-20 लीगच्या सामन्यात देखील असे कॅच पाहायला मिळतात. अशाच एका कॅचचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

फलंदाजाने शॉर्ट मारल्यावर चेंडू हवेत जातो विकेटकिपरच्या बाजूने गेलेला हा चेंडू कोणालाही चौकारच गेला की काय? असं वाटलं. पण त्याच वेळी स्लिपमधील फिल्डर वेगाने हवेत उडी मारून कॅच पकडतो. त्याचा हा कॅच पाहिल्यानंतर फलंदाज आणि अंपायर यांना देखील विश्वास बसत नाही. दक्षिण आफ्रिकेतील एका स्थानिक खेळल्या जाणाऱ्या सामन्यातला या अफलातून कॅचचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

स्लिपमध्ये उभ्या असलेल्या फिल्डरने शॉर्ट फाइन लेगला जाऊन कॅच घेतला. जेव्हा गोलंदाजाने चेंडू टाकला तेव्हा फलंदाजाने पॅडल स्विप मारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी स्लिपमध्ये उभ्या असलेल्या खेळाडूने शॉर्ट फाइन लेगला पळत जाऊन कॅच घेतला. हा कॅच पाहिल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडेल की चौकार जाणारा चेंडू कसा काय पकडला. क्रिकेटमधील अनेक शानदार खेळी किंवा कॅच हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाही तर स्थानिक क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतात.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघात अनेक दर्जेदार खेळाडू आहेत. एबी डिव्हिलियर्स, जॉन्टी रोड्स त्यापैकी एक नाव होय. जॉन्टी रोड्सने 1992च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या इंझमाम उल हकला ज्या पद्धतीने धावबाद केले होते. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम धावबाद मानले जाते.

थोडक्यात बातम्या –

‘मुंबईतील त्या दिवशीच्या ‘बत्तीगुल’मागे चीनचा हात?’; ऊर्जा मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

पुण्यातील ‘या’ ठिकाणी गजा मारणेला वडापाव खाणं पडलं महागात; झाला गुन्हा दाखल

‘पूजाच्या आई-वडिलांनी पाच कोटी घेतले’; शांता राठोडांच्या आरोपावर लहू चव्हाणांनी सोडलं मौन, म्हणाले..

‘जुनं ते सोनं’! इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी बैलगाडीतूनच केली नवरा-नवरीची पाठवणी!

संजय राठोडांनी आधीच राजीनामा दिला असता तर…- पंकजा मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More