बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दगडूशेठ गणपतीचा अनोखा उपक्रम, 5 लाख भाविकांनी घेतले दर्शन!

पुणे | गणपती बाप्पांचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. सर्व गणेशभक्त बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी करत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही गणेशोत्सवावर संकट आहे. दोन दिवसांपुर्वी संकष्टी ही अंगारकी चतुर्थी होती. गणेशभक्तांना गणेश दर्शनाची आस होती. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराने मात्र भक्तांच्या या भावनेचा आदर करीत तंत्रज्ञानाचा वापर करीत एक अनोखा प्रयोग केला.

अंगारकी निमित्त मंदिरात केलेल्या आरासी चे थ्री डी स्कॅनिंग केले व ते भक्तांना त्यांच्या मोबाईल वर उपल्बध करून दिले. यामुळे भक्तांना घरबसल्या अगदी थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याचा व्हर्च्युअल अनुभव घेता आला. मंगळवारी सकाळी ही लिंक व्हॉट्सअप वरून तुफान व्हायरल झाली. जगभरातील जवळपास लाखहुन अधिक भाविकांनी अगदी प्रत्यक्ष दर्शनासारख्या दर्शनाचा लाभ घेतला.

दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्ट चे व हे तंत्रज्ञान बनवणाऱ्या पुण्यातील व्हर्चुअल रिऍलिटी क्षेत्रातील नामवंत डिजिटल आर्ट व्हीआरई संस्थेचे सर्वत्र कौतुक होत असून असंख्य भक्तांनी सोशल मीडियावर त्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, सध्याच्या कठीण कोविड काळात अशा तंत्रज्ञानाची गरज असल्याचं मत अनेकांनी मांडलं. गणोशोत्सवात वेगवेगळ्या मंडळांनी देखील या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन व्हर्च्युअल दर्शनाची सोय केल्यास भक्तांना आनंद होईल अशाही बऱ्याच प्रतिक्रिया आल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

गारवा हॅाटेलच्या मालकाची हत्या, अत्यंत धक्कादायक खरी स्टोरी आली समोर!

2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान- रामदास आठवले

“सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत”

‘चंद्रशेखर बावनकुळे सरकार पाडण्यासाठी झारखंडला गेले होते’; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपावर बावनकुळेंनी सोडलं मौन,म्हणाले…

महत्त्वाची बातमी! राज्यातील 25 जिल्हयांमध्ये निर्बंध शिथिल तर या 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More