बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संकष्टी चतुर्थीला पुण्यातील दगडूशेठ मंदिर बंद, प्रशासनानं केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

पुणे | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यातही खबरदारी घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज संकष्टी चतुर्थीला प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर बंद ठेवण्यात आलं आहे.

केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील. तर कोरोनामुळे गणेश भक्तांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असं आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी केलं आहे.

संकष्टी चतुर्थीला शहर आणि इतर ठिकाणाहून हजारो भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामूळे मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे.

गर्दी टाळण्यासाठी आज मंदिर बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे भक्तांना आज मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.गणेश भक्तांसाठी घरबसल्या दर्शनाची सोय ट्रस्टने केली आहे.

ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असं आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आलं आहे.

संकष्टी चतुर्थीसह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था आणि इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील.

थोडक्यात बातम्या

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनात एकनाथ शिंदेंना डावललं; भाजप नेत्याचं प्रश्नचिन्ह!

शरद पवारांवर शस्त्रक्रिया; राणे पिता-पूत्रांनी गाठलं ब्रीच कँडी रुग्णालय

कोरोनाविरुद्ध कठोर पावलं उचला नाहीतर… केंद्र सरकारचा राज्यांना मोठा इशारा

व्हिडीओ कॉल उचलताच तरुणी कपडे काढू लागली, त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

मित्राच्या गर्लफ्रेंडला घरी बोलावून दारु पाजली, त्यानंतर केला बलात्कार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More