रांची | मागील काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन देशभर चर्चेत आहे. पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून बसले आहेत. सामान्य शेतकऱ्यांपासून चालु झालेलं आंदोलन आता राजकीय रंगात रंगू लागलं आहे. 26 जानेवारी नंतर शेतकरी आंदोलनात राजकीय पक्षांचा प्रवेश झाला.
काँग्रेस पक्षाने देखील देशभर जनआक्रोश रॅली आयोजीत केल्या आहेत. काँग्रेसने आयोजित केलेल्या अशाच एका रॅलीत एक डान्सर ठुमके लावतानाचा व्हिडीओ भाजप नेत्यांने शेअर केला आहे. गुरुवारी झारखंडमधील सरायकेला-खरसांवा जिल्ह्यात काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी जनआक्रोश रॅली आयोजित केली होती. या सभेचा व्हिडीओ झारखंडचे भाजप प्रवक्ते कुणाल सारंगी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
या सभेत गर्दी जमवण्यासाठी एका डान्सरला बोलवण्यात आल्याचं बोललं जातं आहे. या व्हिडीओमध्ये डाॅन्सर ‘लैला मै लैला’ या गाण्यावर ठुमके लावताना दिसत आहे. मागे काही नेते मंडळी आणि काही महिला खुर्चीवर बसलेलेे सुद्धा दिसत आहेत. हा व्हिडीओ 18 फेब्रुवारीचा असल्याचं सांगितलं जातं आहे. ही जनआक्रोश रॅली काँग्रेस नेते आलमगीर आलम यांनी आयोजीत केली होती.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये मागील पोस्टरवर काँग्रेस पक्षाचे चिन्ह आहे. सोबतच ‘किसान बिल के विरोध में जनआक्रोश रॅली’ असे लिहिलेलं दिसत आहेत. ‘काँग्रेसचं शेतकऱ्यांबद्दल प्रेम पाहून डोळ्यात पाणी आलं’ अशी टीका कुणाल सारंगी यांनी केली. प्रियंका गांधी देखील उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या जनआक्रोश रॅलीत सहभागी होत आहे. या जनआक्रोश रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस नेते सरकार विरोधी टीका करत आहेत.
पाहा व्हिडीओ-
#इटली की हवा में #डांस है साहिब, हवा को तो रोक लोगे लेकिन #डांस को कैसे रोकोगे? #Raees @INCIndia की किसानों से इस बेपनाह मोहब्बत को देख कर आंसू आ गए। 18 फरवरी को सरायकेला खरसवां जिले के कुकडू प्रखंड में आयोजित जनाक्रोश रैली का नजारा।@BJP4India @BJP4Jharkhand @Tejasvi_Surya pic.twitter.com/EnlSDboZhm
— Kunal Sarangi (@KunalSarangi) February 20, 2021
थोडक्यात बातम्या-
अभिनेत्री प्रिया बापटचं पारंपरिक अंदाजातलं ग्लॅमरस फोटोशूट, पहा तिचे अदाकारी फोटोज!
‘मंत्रिपद हे फक्त नाचण्यासाठी नसतं तर…’; हर्षवर्धन पाटलांचा दत्तात्रय भरणेंना टोला
उद्धवजींचं सरकार ना रामाचं…ना भिमाचं…नाही काही कामाचं- रामदास आठवले
धक्कादायक! थुंकी लावून लोकांना वाढायचा, समोर आला किळसवाणा प्रकार, पाहा व्हिडीओ
“मोदी साहेब ‘मन की बात’मधून चांगलं बोलतात परंतु कृती काहीच करत नाही”