बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

8 वर्षाच्या प्रेमात मिळाला धोका, त्यानंतर प्रियकराने जे केलं ते पाहून पोलिसही चक्रावले

नवी दिल्ली | छत्तीसगड येथील कोरबा येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात धोका मिळाल्यानंतर प्रियकराने त्याचा बदला घेण्यासाठी आपल्या प्रेयसीसोबत जे केलं त्यानं सर्वांनाच सुन्न केलं आहे. विशेष म्हणजे बदला घेण्यासाठी जो कट रचण्यात आला होता ते पाहून पोलिसही चक्रावले.

कोरबा येथील कटघोरा येथे ही घटना घडली आहे. मृत झालेल्या प्रेयसीचं नाव कृष्णा गोस्वामी असं आहे. तर तिच्या प्रियकराचं नाव संजय चौव्हान असं आहे. कृष्णा आणि संजयचं गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कृष्णाचं संजयसोबत प्रेमसंबंध असून देखील ती इतर अनेक मुलांसोबत फोन आणि मेसेजवर बोलत होती. संजयने कृष्णाला अनेक वेळा इतर मुलांसोबत बोलण्यासाठी नकार दिला तरी कृष्णाने बोलणं बंद न करता ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

कृष्णाच्या वडिलांनी तिचं लग्न ठरवलं असता यावरुन वडिल आणि कृष्णामध्ये सतत वाद होत होता. याच रागातून संजयने थेट कृष्णाचं घर गाठलं आणि त्यांच्या वादाचा फायदा उचलला. संजयने कृष्णाला मुलांशी बोलणं बंद करुन आपल्यासोबत लग्न करण्याची मागणी घातली. तसेच नकार दिल्यास जीवे मारण्याची देखील धमकी दिली. यावेळी कृष्णाने नकार देताच संजयने ओढणीने तिचा गळा दाबून तिची हत्या केली.

दरम्यान, हत्येनंतर संजयने कृष्णाच्या फोन वरुन स्वतःला मेसेज केला. यामध्ये माझे वडिल मला मारुन टाकतील, मला वाचव असं लिहिलं होतं. हत्या सुमारे पहाटे घडली असून सकाळी कृष्णाच्या वडिलांनी मृतदेह बघताच तिच्या गळयातील ओढणी काढली ज्यामुळे ओढणीवर वडिलांच्या हाताचे ठसे उमटले. संजयने सर्व पुरावे वडिलांच्या विरुद्ध केले. मात्र पोलिसांना संजय आणि कृष्णा बद्दल समजताच पोलिसांनी संजयची कसून चौकशी केली. यावेळी त्याने गुन्हा कबुल केला.

थोडक्यात बातम्या-

“एक रुपया इंधन दरवाढ झाली की आंदोलने करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते आता कुठे लपलेत?”

“चंद्रकांत पाटलांना मस्ती आलीये, आपलं हसं होऊ नये म्हणून…”

“मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच पडली पाहिजे”

‘परमबीर सिंग यांच्या इशाऱ्याने वाझेकडून खंडणी वसुली’; कार डिझायनरच्या पत्राने खळबळ

‘फेसबुक लाईव्ह म्हणजे नुसत्या कोरड्या गप्पा’; मुख्यमंत्र्याच्या भाषणावर भाजपने विचारले हे ‘6’ प्रश्न

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More