महाराष्ट्र मुंबई

प्रवीण दरेकर यांचा मुंबई महानगरपालिकेवर गंभीर आरोप, म्हणाले…

मुंबई | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महानगरपालिकेवर दलालांमार्फत कोविड रुग्णालयांचे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रवीण दरेकर यांनी आज मुलुंड पश्चिम आयबीएस रोड येथील जम्बो कोविड रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

जम्बो कोविड सेंटरचं 7 जुलैला उद्घाटन झालं, परंतु अजून देखील येथे आयसीयू कक्ष नाहीत. एजन्सीमार्फत लूटमार सुरु आहे. या एजन्सीने 10 पट पैसे आकारण्याचे काम केले आहे. यात मुंबई महापालिकेचाही समावेश आहे. 100 बेड असतील, तर 400 बेडची बिलं लावली जात आहेत, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.

मुंबई महापालिका दलालांमार्फत कोविड रुग्णालयांचे पैसे उकळत आहे. भाजप याचा पर्दाफाश करणार आहे. मुंबईकरांचे अवाजवी पैसे जाणार नाहीत. डॉक्टर आणि नर्सेसचे देखील अनेक प्रश्न आहेत, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.

दरम्यान, शिवसेनेसाठी मुंबईच्या चाकरमान्यांचे योगदान मोठं होतं. त्याच चाकरमान्यांना शिवसेनेचे नेते विनायक राऊत येऊ नका म्हणून सांगतात. शिवसेनेला कोकणवासीयांचा काहीही पुळका आला नाही. मी दौरा केल्यानंतर राज्यपालांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे ही मदत झाली आहे, असंही प्रवीण दरेकर म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल

युजवेंद्र चहल लवकरच अडकणार लग्नबंधनात, घरच्या घरी साखरपुडा सोहळा संपन्न

विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट

राज्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; दिवसभरात ‘इतक्या’ हजार कोरोनाबाधितांची नोंद

कोल्हापुरात खासगी रुग्णालयाला सरकारी ऑडिटरचा दणका, रुग्णाच्या बिलात ‘इतक्या’ लाखांची केली कपात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या