“संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवर दबाव टाकून…”; प्रवीण दरेकरांचे गंभीर आरोप
मुंबई | राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये विविध प्रकरणांवरून जोरदार संघर्ष उद्भवला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची सध्या बोगस मजूर प्रकरणात चौकशी चालू आहे. अशातच आता दरेकर यांनी खळबळ माजवणारे आरोप केले आहेत.
महाविकास आघाडी सरकार सुडबुद्धीनं कारवाई करत आहे. संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवर दबाव आणून आपल्यावर कारवाई केली आहे, असा आरोप दरेकर यांनी केला आहे. बोगस मजूर प्रकरणात दरेकर यांच्यावर मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल आहे. आपण कोणत्याही चौकशीला सामोरं जावू, असं दरेकर म्हणाले आहेत.
किरीट सोमय्या यांच्या आयएनएस विक्रांत प्रकरणावर दरेकर यांनी सोमय्यांची बाजू घेतली आहे. सोमय्या हे धाडसी नेते आहेत. शब्द पाळणारे नेते असल्यानं ते कारवाईला सामोरं जातील, असं दरेकर म्हणाले आहेत. बोगस मजूर प्रकरणात सध्या दरेकर यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
दरम्यान, दरेकर यांनी राऊत यांच्यावर आरोप केल्यानंतर आता राज्यात राजकारण पेटलं आहे. दरेकर यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप दरेकरांनी फेटाळले आहेत.
थोडक्यात बातम्या –
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आयसीयू सेंटरचे भूूमिपूजन होणार!
“प्रकाश आंबेडकरांनी मुलावर कशाप्रकारचे संस्कार केलेत?”
मोदी-बायडन यांच्यात वर्च्युअल बैठक; रशिया-युक्रेन युद्धाबाबत नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य
“लोकांना कायद्यापासून पळू नका म्हणणारेच आता #*# पाय लावून पळतायंत”
पाकच्या नव्या पंतप्रधानांना मोदींनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले…
Comments are closed.