धर्मा पाटलांची प्रकृती खालावली, अवयवदानाचा अर्ज भरला

मुंबई | मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केलेले शेतकरी धर्मा पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. त्यांच्या कुटुंबियांनी तर अवयवदानाचा अर्जही भरलाय. 

धर्मा पाटील यांच्यावर सध्या मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांकडून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

औष्णिक वीज प्रकल्पासाठी सरकारनं त्यांची जमीन घेतली होती. मात्र योग्य मोबदल्यासाठी त्यांना मंत्रालयाच्या पायऱ्या  झिजवाव्या लागल्या. न्याय न मिळाल्यानं त्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.