बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तालुक्यात विकास केल्यामुळं मला शांत झोप लागते’; भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

पुणे | भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून शांत झोप लागते, कुठली चौकशीही नाही, असं वक्तव्य भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलं होतं. यावर प्रतिक्रिया देत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांना जोरदार टोला लगावला आहे. ते इंदापुरातील का खासगी कार्यक्रमात बोलत होते.

इंदापूर तालुक्यात विकासकामं केल्यामुळे मला शांत झोप लागते, अशा शब्दात भरणेमामांनी हर्षवर्धन पाटलांना चिमटा काढलाय. भरणेंच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये मात्र चांगलाच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.

पाटील यांनी आता आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन वेगळे अर्थ काढले जात आहेत. मी भाषणात कुणाचाही उल्लेख केला नाही. कुणाचा उल्लेख करणं गरजेचं असल्याचं मला वाटत नाही. त्यामुळे वाक्याचा अनर्थ कुणी काढू नये, असं म्हटलंय.

मला विधानसभेला तिकीट नाकारण्यात आलं म्हणून मी भाजपमध्ये गेलो. हा माझा राजकीय निर्णय आहे. माझ्या कुठल्याही चौकशीचा व माझ्या भाजप प्रवेशाचा काही एक संबंध नाही. विधानसभेला मला तिकीट देण्याचा शब्द दिला होता. मात्र, तो पाळला गेला नाही. त्यामुळेच मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

जर कोणी धर्माची मस्ती घेऊन माझ्यासमोर उभा राहिला तर मी…- उद्धव ठाकरे

आरोग्यमंत्री रूग्णालयात फोटोग्राफर घेऊन आले अन् मनमोहन सिंग यांची मुलगी संतापली

‘सरकारी नोकऱ्याच नाहीत तर आरक्षण कुठून देणार?’; नितीन गडकरींचं रोखठोक मत

“मुख्यमंत्रीपद गेल्यावर दोन माणसंही भेटायला येत नाहीत”

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More