बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रा. दत्तात्रय चव्हाण यांना अर्थशास्त्र विषयात Ph.D.पदवी

पुणे | पारगाव तर्फे आळे ता. जुन्नर येथील रहिवासी प्रा. दत्तात्रय चव्हाण यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडुन अर्थशास्त्रात पदवी प्रदान करण्यात आली. गेली १५ वर्ष ते महाविद्यालय स्तरावर अर्थशास्त्र व बँकींग विषयाचे अध्यापनाचे कार्य करत आहेत. त्यांनी ” सेंद्रिय शेती उत्पादन आणि विपणनाचा चिकित्सक अभ्यास, विशेष अभ्यास- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका ” या विषयावर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे संशोधन प्रबंध सादर केला.

चव्हाण यांना अर्थशास्त्र विषयाचे प्रसिद्ध तज्ज्ञ लेखक पाबळ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुरेश ढमढेरे यांनी मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे (BOS) चेअरमन प्रा. डॉ. संभाजी काळे, टि.म.वि.पुणे च्या डीन डॉ. रेनविकर मॅडम अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रवीण जाधव या तज्ञांनी परिक्षणाचे कार्य केले.

तसेच डॉ. श्रीकांत फुलसुंदर (नारायणगाव महाविद्यालय) डॉ. विनायक कुंडलिक, डॉ हर्षल जाधव (मुंबई विद्यापीठ) डॉ. शाकूराव कोरडे, प्रा.सचिन बराटे, प्रा.दत्तात्रय डुकरे श्री बाळासाहेब ढोमे, श्री अमोल ढोमे यांचेही वेळोवेळी सहकार्य लाभले.

हे संशोधन शेती व शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने शेतीच्या अर्थशास्त्रात सकारात्मक बदल घडवेल, असा विश्वास डॉ. संभाजी काळे यांनी व्यक्त केला. तर हे संशोधन मानवी समाज, सजीव सृष्टी व पर्यावरणाच्या दृष्टीने समाजाभिमुख असल्याचे गौरवोद्गार बोरी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री. एस.आर.शिंदे दादा यांनी काढले व त्यांचे कौतुक केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More