बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

क्रिकेट सामनानिश्चिती हे सगळ्यात ‘स्वच्छ काम’- दाऊद इब्राहिम

नवी दिल्ली |  क्रिकेट सामनानिश्चिती करणे हे एक प्रकारे सगळ्यात स्वच्छ काम आहे. कारण यासाठी कोणाला जबरदस्ती करावी लागत नाही किंवा कोणाची हत्या करावी लागत नाही, असं वक्तव्य कुख्यात डाॅन दाऊद इब्राहिम याने केलं आहे.

‘नो बॉल : द मर्की वर्ल्ड ऑफ मॅच फिक्सिंग’ या पुस्तकामधून लेखक चंद्रमोहन पुप्पाला यांनी क्रिकेटमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचे दर्शन घडवलं आहे. यात क्रिकेट जगतातले अनेक खुलासे करण्यात आले आहेत.

या पुस्तकात दाऊद इब्राहिम याचाही संदर्भ आला आहे. सामनानिश्चितीच्या खेळामध्ये दाऊदने कशा सहजतेने प्रवेश मिळवलं याचंही वर्णन यात आलं आहे.

सामनानिश्चितीसाठी इकडच्या तिकडच्या खेळाडूंशी संपर्क प्रस्थापीत करुन पैशाची फक्त देवाणघेवाण करावी लागते, असं दाऊद म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या

-कारवाई करा नाहीतर राजीनामा देईन- नवज्योतसिंग सिद्धू

-मोदींच्या पत्रकार परिषदेवरुन राज ठाकरेंनी काढला चिमटा, म्हणाले…

-कोणीही काहीही म्हणू देत, पण ‘फिर एक बार मोदी सरकार’च- उद्धव ठाकरे

-निकालाआधीच वंचित बहुजन आघाडीत फुट; आंबेडकरांवर गंभीर आरोप करत ‘या’ नेत्याचा राजीनामा

-“लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकातील सरकार कोसळणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More