बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

4 गुंठ्यात शेतकऱ्याने लावला होता गांजा, महिला अधिकाऱ्याच्या कर्तबगारीने बिंग फुटलं…!

दौंड | दौंड तालुक्यातील गिरीम येथे गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यास अटक करून त्याच्याकडील 21 लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पुढाकाराने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना गिरीम येथे गांजाची शेती केली जात असल्याची माहीती मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस करवाईचे आदेश दिले होते. दौंड तालुक्यातील गिरीम येथील शिंदे वस्ती येथे पोलिसांनी छापा टाकून गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गिरीम गावातील दत्तू शंकर शिंदे या शेतकऱ्याने तब्बल 4 गुंठे क्षेत्रात सहज दिसणार नाही अशा छुप्या पद्धतीने गांजाची शेती केली होती. पोलिसांनी शेतातील गांज्याची झाडे उपटून काढून जप्त केली आहेत. या कारवाईत जवळपास 173 झाडे आणि विक्री साठी ठेवलेल्या सुक्या स्वरूपातील 140 किलो गांजा, असा 21 लाख 01 हजार 500 रुपयांचा गांजा जप्त केलाय.

तर या शेतकऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी (आयपीएस) ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, दौंड पोलीस निरीक्षक सुनील महाडीक, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, आदी पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात आज 259 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा नव्याने किती रूग्ण वाढले…

कोरोनाबाबत महत्त्वाचं संशोधन; ‘या’ रक्तगटाच्या लोकांना अधिक धोका!

महत्वाच्या बातम्या-

तुम्ही आश्वासन दिलं होतं, आता दिलेल्या शब्दाला जागा… काँग्रेसला या मित्रपक्षाचं साकडं!

कौतुकास्पद… PSI साहेबांनी लग्नाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले 1 लाख रूपये!

कोरोना चाचणीचा दर सरकार ठरवणार, तोच रूग्णालयांना घ्यावा लागणार; ठाकरे सरकारचं महत्त्वाचं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More