बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ह्रदयद्रावक! पुराचं पाणी शिरल्याने चिपळूणच्या कोविड सेंटरमधील व्हेंटिलेटरवरील 8 रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी |  मुसळधार पावसामुळे कोकणातील चिपळूण भागाता मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली आहे. चिपळूणमध्ये दरडी कोसळून 38 लोकांनी आपला जीव गमावला होता. ही घटना ताजी असतानाच अत्यंत ह्रदयद्रावक घटना चिपळूणच्या कोविड सेंटरमध्ये घडली आहे. कोविड सेंटरमध्ये पाणी गेल्याने व्हेंटिलेटरवरील 8 लोक गेल्याची माहिती समजत आहे.

चिपळूणमधील कोविड सेंटर असलेल्या अपरांत हॉस्पिटलमध्ये पाण्याचा लोट आत आला. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये चिखल आणि पाणी झालं. रूग्णांना वाचवण्यासाठी स्थानिक तरूणांनी पाण्यात उड्या घेत रूग्णांना बाहेर काढलं मात्र कंबरेपेक्षा जास्त पाणी संपुर्ण अंंधार असल्यामुळे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. पाणी गेल्याने ऑक्सिजन सिलेंडर बंद पडले आणि 8 रूग्णांना आपला जीव गमावावा लागला.

पुराच्या पाण्यामुळे संपुर्ण कोविड सेंटरमध्ये चिखल झाला आहे आणि त्यासोबत प्रत्येक वॉर्ड हा पाण्याने भरला आहे. दवाखान्याच्या रूग्णवाहिकाही पाण्यामध्ये बुडाल्या असून कोविड सेंटरचे पत्रेही उडून गेले आहेत.

दरम्यान, या हॉस्पिटलमध्ये एकूण 20 रुग्ण होते त्यापैकी 8 जणांचा मृत्यु झाला असून 12 जणांना शासकीय रुग्णालय आणि इतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“आम्ही पूरग्रस्त भागात बोटीत बसून निर्णय करायचो, तुम्हीही डायरेक्ट फिल्डवर उतरा”

“‘मुख्यमंत्री मंत्रालयात गेले’ ही बातमी व्हावी इतके वाईट दिवस महाराष्ट्रावर आलेत”

मोठी बातमी! शाळेच्या अभ्यासक्रमाबाबत शिक्षणमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

महाराष्ट्रात पावसाचं रौद्र रुप! वरंध्याच्या घाटात गेल्या 24 तासांत 30 ठिकाणी दरडी कोसळल्या

“सतत पाऊस कोसळणाऱ्या भागातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More