“मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामू मिळालेत”; दीपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सभांचा घडाका लावला आहे. गुढीवाडवा मेळावा, उत्तर सभा व औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) फैलावर घेतलं.
राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला विशेषत: शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादीला (NCP) धारेवर धरलं. तीन सभांमध्ये तुफान फटकेबाजी केल्यानंतर राज ठाकरे 21 मे रोजी पुण्यात सभा घेणार होते. संपूर्ण राज्याचं लक्ष या सभेकडे लागलं असताना पुण्यात पावसाच्या शक्यतेमुळे राज ठाकरेंची सभा रद्द झाली.
पावसामुळे रद्द झालेल्या राज ठाकरेंच्या सभेवरून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी मनसेला (MNS) पुन्हा डिवचलं आहे. पावसाचे कारण देऊन मैदान सोडले. भोंग्याचे कारण देऊन देशपांडे पळाले. अयोध्याचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामु मिळाले, अशा खोचक शब्दात दीपाली सय्यद यांनी टीका केली आहे.
दरम्यान, राज ठाकरेंची 21 मे रोजी पुण्यात होणारी सभा रद्द झाली आहे. मात्र, राज ठाकरे आता कुठे सभा घेणार याबद्दल आज मनसेकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
पावसाचे कारण देऊन मैदान सोडले
भोंग्याचे कारण देऊन देशपांडे पळाले
अयोध्याचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामु मिळाले.@mnsadhikrut @ShivSena— Deepali Sayed (@deepalisayed) May 18, 2022
थोडक्यात बातम्या-
‘या’ लोकांनी का घेऊ नये कोरोनाचा दुसरा बूस्टर डोस?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती
“पुरून उरेल तुम्हाला… चित्रा वाघ म्हणतात मला”
धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना दिली महाविकास आघाडीत यायची ऑफर?, म्हणाले…
राज ठाकरेंची सभा होणार?, मनसे उद्या महत्त्वाची घोषणा करणार
‘…त्या धारेची किंमत मलाही मोजावी लागली’; शरद पवारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
Comments are closed.