‘मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती’, दीपाली सय्यद यांनी मनसेला पुन्हा डिवचलं
मुंबई | राज्यातील राजकारण आत जोरदार तापले आहे. सगळ्याच पक्षांकडून आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.शिवसेनेवर चौफेर टीका होत असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तर शिवसेना आता शून्यातून पुन्हा पक्षबांधणी करत आहे. राज ठाकरे यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर आगपाखड केली.
आता मनसेच्या या टीकेवर आणि आरोपांवर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी ट्विट करत मनसेवर निशाणा साधला आहे. मनसे हा पक्ष म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती आहे, अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणजे कार्यकर्त्यांना सोडून घरी बसलेला गृहमंत्री. शॅडो कॅबिनेटने अयोध्येला जाता येत नसते रे भोंगामंत्री. तुम्ही गृहमंत्री तर ब्रिजभूषण कोण, तुमचा संरक्षण मंत्री? असे सय्यद म्हणाल्या.
दीपाली सय्यद यांनी मनसेच्या रद्द झालेल्या अयोध्या दौऱ्यामुळे आणि मनसेच्या यापूर्वी बनविलेल्या शॅडो कॅबिनेटवरून मनसेला चांगलेच धारेवर धरत टीका केली आहे. दीपाली सय्यद मनसेवर सातत्याने टीका करत असतात. मनसेकडून अमित ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे म्हणाले होते की, मला ठाकरेंच्या सरकारमध्ये गृहमंत्री व्हायला आवडेल.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर मनसेकडून शॅडो कॅबिनेटची (Shadow Cabinet) स्थापना केली होती. त्यांचे काम महाराष्ट्राचे सरकार नीट काम करते की नाही, हे पहाणे होते. दीपाली सय्यद यांनी मनसेला या मुद्द्यावरुन डिवचले आहे.
मनचे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती,
अमित म्हणजे कार्यकर्त्यांना सोडुन घरी बसलेला गृहमंत्री. शॅडो कॅबिनेट ने अयोध्याला जाता येत नसते रे भोंगामंत्री. तुम्ही गृहमंत्री तर ब्रिजभूषण कोण तुमचा सरंक्षण मंत्री? @ShivSena @mnsadhikrut— Deepali Sayed (@deepalisayed) July 23, 2022
थोडक्यात बातम्या –
‘शिवसेनेच्या अश्रुत हे सरकार वाहून जाईल’, संजय राऊत शिंदे सरकारवर बरसले
‘शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं कारण…’, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
नीरज चोप्राचा चंदेरी विजय, वर्ल्ड चँपियनशिपमध्ये रचला नवा इतिहास
येत्या तीन महिन्यात मध्यावधी निवडणुका लागणार?, रोहित पवारांच्या वक्तव्याने खळबळ
सध्याच्या राजकारणावर नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed.