बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वात मोठी बातमी! पणजी मतदार संघातून उत्पल पर्रीकर यांचा पराभव

पणजी | पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती यायला सुरूवात झाली आहे. गोवा (Goa) छोटं राज्य असली तरी गोव्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत असतात. गोवा विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सकाळीच सुरूवात झाली असताना गोव्यातून मोठी बातमी समोर येत आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर  यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांचा गोव्यात पराभव झाला आहे. पणजी मतदारसंघातून उत्पल पर्रीकर यांचा तब्बल 800 मतांनी पराभव झाला आहे. (Goa Assembly Election Result 2022)

गोव्यात भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) काँटे की टक्कर पाहायला मिळत असताना उत्पल पर्रीकर अडचण ठरत होते. पोस्टल मतपत्रिकांच्या मतमोजणीत उत्पल पर्रीकर आघाडीवर होते. त्यामुळे भाजपची चिंता वाढली होती. मात्र, उत्पल पर्रीकरांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे.

दरम्यान, गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. उत्पल पर्रीकर यांचा पराभव झाला आहे तर शिवसेनेला गोव्यात खातं देखील उघडता आलेलं नाही. त्यामुळे गोव्यात मुख्यमंत्री कोण होणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवलाय”

Goa Election Result 2022: मनोहर पर्रीकरांच्या मुलाचा भाजपला जोर का झटका

Up Election Result 2022: पहिल्या दीड तासात शिवसेनेचा फ्लाॅप शो

UP Election Result 2022: उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा हादरा

“योगी पुढे जाणार हे नक्की होतं, पण….”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More