नवी दिल्ली | केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज पॅरिसला जाणार आहेत. तिथे वायु सेना दिनाला भारताला पहिलं राफेल लढाऊ विमान मिळेल. उद्या दसरा असल्याने तिथे रजनाथ सिंह राफेल हँड ओव्हर सेलिब्रेशन दरम्यान शस्त्र पुजाही करणार असल्याचं कळतंय. हा कार्यक्रम दक्षिण फ्रान्सच्या बॉगदू शहरात आयोजित करण्यात आला आहे.
राजनाथ सिंह मंगळवारी राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेऊन त्यानंतर फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांसोबत राजनाथ सिंह डिफेन्स डायलॉग कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं समजतंय.
संरक्षणमंत्री यावेळी राफेल विमानात उड्डाण करतील. त्यांच्यासोबत आणखी तीन राफेल फायटर्स उड्डाण घेतील. पहिलं राफेल पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत भारतात येणार असल्याची माहिती आहे.
भारताला राफेल विमानांसोबत सर्वात अॅडव्हान्स शस्त्रही मिळतील. यामध्ये Meteor आणि Scalp मिसाईल्स असतील, असं युरोपियन मिसाइल निर्माता MBDA ने सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
मनसे उमेदवाराने शिवसेना शाखेत जाऊन घेतले बाळासाहेबांच्या फोटोचे दर्शन!- https://t.co/0WeQKZoTeV #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 7, 2019
‘आरे’च्या बाबतीत जी दडपशाही सुरू आहे ती हिटलरशाहीच; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात https://t.co/sCnuWaTtzw @OfficeofUT @Dev_Fadnavis #Aarey
— थोडक्यात (@thodkyaat) October 7, 2019
‘आरे’मधल्या वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाकडून ब्रेक! वृक्षतोड लगोलग थांबवण्याचे आदेश https://t.co/ZEOMgBDiqT #AareyForest
— थोडक्यात (@thodkyaat) October 7, 2019
Comments are closed.