Top News महाराष्ट्र मुंबई

मनसेचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांच्या भेटीला; नितीन राऊतांकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई | मनसेच्या शिष्टमंडाळाने आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मंत्र्यांना वीज बील कमी करण्याबाबत पत्र दिलं. यावेळी ऊर्जामंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिली आहे.

मनसेने ऊर्जा मंत्र्यांकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन ऊर्जा मंत्र्यांनी दिलं असल्याचं अभ्यंकर यांनी सांगितलं आहे. काही नागरिक गावी गेले होते. त्यांनी विजेचा वापर केला नाही. तरीही त्यांना दुप्पट-तिप्पट वीज बिल आलं आहे. या विषयावर सविस्तर चर्चा झाली असल्याचं अभ्यंकर यांनी सांगितलं आहे.

ऊर्जामंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की, फक्त करेक्शन नाही, तर करेक्शननंतरही तफावत आढळली तर तेही बघू. पण आम्ही करेक्शन केलेल्या बिलमध्ये कमीत कमी 50 टक्के सवलत द्यावी, अशी मागणी केली आहे, असं अविनाश अभ्यंकर यांनी सांगितलं आहे.

खासगी वीज कंपन्यांना आमचं सांगणं आहे की, आता पैसे कमवायचं थोडं थांबवा. ज्या लोकांनी तुम्हाला कमवून दिलं आहे, त्यांचा विचार करा. जनतेचा विचार करा, त्यांना त्रास देऊ नका, असं अविनाश अभ्यंकर म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

“गांधी कुटुंबावरील संकटं संपलेली नाहीत, त्यांना आजही धोका आहे”

महाराष्ट्रात आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याच्या अंदाज

शेतकऱ्यांसाठी सहकार मंत्र्यांची मोठी घोषणा, जुलैअखेरपर्यंत….

जन्माला आला तो मरणारच, एखादाच माझ्यासारखा असतो ज्याला…- उदयनराजे भोसले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या