दुबई | आयपीएलच्या काल सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला. मात्र या सामन्यादरम्यान दिल्लीच्या खेळाडूंच्या हातावर असलेल्या काळ्या पट्टीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. ही काळी पट्टी नेमकी का बांधली होती हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात आहे.
तर दिल्लीचा फास्ट बॉलर मोहित शर्मा याच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनामुळे मोहित शर्मा भारतात परतलाय. मोहितच्या वडिलांच्या निधनामुळे दिल्लीच्या टीमने हाताला काळी पट्टी बांधली होती.
मोहित शर्माच्या वडिलांचे मुंबईविरुद्धच्या क्वालिफायर सामन्यापूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे मोहितच्या वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी दिल्लीच्या खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधली होती.
यापूर्वी 22 ऑक्टोबर रोजी किंग्ज इलेव्हेन पंजाबच्या मनदीप सिंगच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यावेळी त्यांना श्रद्धांजली देत किंग्ज इलेव्हन पंजाबच्या खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
…तर नितीशकुमार उद्या विरोधकांपुढेही झुकलेले दिसतील- चिराग पासवान
…तर साष्टांग नमस्कार घालण्यास देखील मी तयार- उदयनराजे भोसले
पोलीस समोर आला; वाहनचालक त्याला बोनेटवर घेऊन निघाला; थरार CCTVत कैद!
ऑनलाईन वर्गाला ‘इतक्या’ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर!
नाट्यगृहांचं भाडं कमी करणार- मुख्यमंत्री