प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना अखेर बेड्या

पुणे | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना त्यांच्या पत्नीसह अटक करण्यात आलीय. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दिल्लीत ही कारवाई केली. 

कुठेही पळून जाणारा नाही असा दावा डीएसकेंनी केला होता. मात्र शुक्रवारी सकाळपासून डीएसके गायब होते. पोलिसांनी कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे त्यांचा माग काढला. 

दिल्लीच्या डीएमआर सीएट हॉटेलमध्ये ते थांबले होते. पुणे पोलिसांच्या टीमने पहाटे 5 वाजता त्यांच्या अटकेची कारवाई केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.