Top News खेळ शेती

टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूच्या कुटुंबियांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीत गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन छेडलंय. दरम्यान या शेतकरी आंदोलनाला टीम इंडियाचा फलंदाज शुबमन गिल याने पाठिंबा दिला आहे.

शुबमनचे कुटुंबीय हे शेतकरी आहेत. शुबमनचे आजोबा दीदार सिंह यांनी या आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा व्यत्क केली होती. मात्र त्यांचं वय पाहता शुबमनचे वडील लखविंदर सिंह यांनी जाण्यास नकार दिलाय.

लखविंदर सिंह यांच्या सांगण्यानुसार, “शुबमनने देखील लहानपणी शेतात काम केलंय. त्यामुळे सध्या सुरु असलेलं हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचे आहे, याची त्याला जाण आहे.”

“आजही शुबमनला शेती करण्याची आवड आहे. तसंच क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर गावी येऊन शेती करणार असल्याचं तो सांगतो. जर तो क्रिकेटपटू झाला नसता तर शेतकरी झाला असता, असंही शुबमनच्या वडिलांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“धुळे नंदुरबारच्या निकालावरून महाविकास आघाडीचे उद्याचे भविष्य काय राहील हे स्पष्ट होतं”

राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्त्व कुणाकडे?; शरद पवार यांनी सांगितली ‘ही’ तीन नावं

“सहा महिन्यांचं रेशन सोबत घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही”

“योगी आदित्यनाथ मुंबईत आल्याने उद्धव ठाकरेंची झोप उडाली”

‘पुढील सात दिवसांत वृद्धेची माफी न मागितल्यास….’ ; आंदोलक शेतकरी महिलेची थट्टा पडणार महागात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या