बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हे’ राज्य पुन्हा एकदा लाॅकडाऊनसाठी सज्ज, न्यायालयात स्पष्ट केली भूमिका

नवी दिल्ली | कोरोनाकाळात खबरदारीचा उपाय म्हणून लाॅकडाऊनसारख्या पर्यायाचा अवलंब करण्यात आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषणाला आळा बसला होता. तसेच पर्यावरण रक्षणासाठीही मदत झाली होती. परंतु दिल्लीतील प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतील प्रदुषणामुळे अरविंंद केजरीवाल सरकार विविध पर्यायांच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता वायू प्रदुषणाच्या गंभीर समस्येशी लढा देण्यासाठी दिल्ली सरकारने कडक लाॅकडाऊनसारखी पावलं उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

दिल्लीतील वायू प्रदुषणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असताना आम आदमी पक्षाने आपण लाॅकडाऊनसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. तसेच शेजारील राज्यांच्या एनसीआर भागातही हा नियम लागू केल्यास त्याचा खऱ्या अर्थाने फायदा होऊ शकतो, अशी भूमिका आम आदमी पक्षाने न्यायालयात स्पष्ट केली आहे.

दरम्यान, दिल्लीतील वायू प्रदुषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता दिल्ली, उत्तर-प्रदेश, पंजाब, हरयाणा या राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने 24 तासांचा अवधी दिला असून 24 तासात प्रदुषणावर योग्य तो तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने फटकारल्याने आता प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय निर्णय घेतला जाणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, जाणून घ्या ताजी आकडेवारी

“एकेकाळी सत्तेत असलेले लोक हे करतायेत, हे दुर्दैव आहे”

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून शरद पवारांचा सरकारला एका वाक्याचा सल्ला, म्हणाले…

अमरावती आणि पुण्यापाठोपाठ आता ‘या’ शहरातही जमावबंदी लागू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More