Top News आरोग्य कोरोना देश

“केंद्राने मान्य करावं, देशात समूह संसर्ग झाला आहे”

नवी दिल्ली | संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट आहे. देशात दररोज दिवसागणिक कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. 80 ते 90 हजार दररोज नवे रूग्ण सापडत आहेत. याचसंदर्भात दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी भाष्य केलं आहे.

देशभरात आता कोरोना रूग्णांची संख्या 53 लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता देशात समूह संसर्ग झाला आहे हे केंद्र सरकारने मान्य केलं पाहिजे असं सत्येंद्र जैन यांनी सांगितलं आहे.

आरोग्यमंत्री जैन म्हणाले,”ज्यावेळी दिल्लीत आणि देशातील इतर भागांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने लोकांना कोरोनाचा संसर्ग होतोय, त्यावेळी आपण कोरोनाचा समूह संसर्ग झालेला आहे, हे स्विकारायला हवं. मात्र केवळ आयसीएमआर आणि केंद्र सरकारचं समूह संसर्ग झाल्याचं सांगू शकतं.”

सत्येंद्र जैन पुढे म्हणाले, “मी कशावर विश्वास ठेवतो हे महत्त्वाचं नाहीये. या गोष्टीत मी पात्रंही नाही. मात्र तांत्रिकदृष्ट्या हा समूह संसर्ग आहे. मी असं म्हणू शकतो की, समूह संसर्ग समाजात पसरला आहे. याबद्दल वैज्ञानिक सांगू शकतात.”

महत्वाच्या बातम्या-

मोदीजी शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवतायेत, पण…- राहुल गांधी

नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘सिरीयस मॅन’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

पोलीस भरतीत मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार नाही- अनिल देशमुख

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न!

पुढच्या 24 तासांत राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या